Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनBigg Boss 16: साजिद खानसह हे 16 स्पर्धक करतील 'बिग बॉस'च्या घरात...

Bigg Boss 16: साजिद खानसह हे 16 स्पर्धक करतील ‘बिग बॉस’च्या घरात धमाल, अनेक स्टार्स ठरले आहे वादग्रस्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही जगतातील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ सुरू झाला आहे. शनिवारी रात्री या शोचा भव्य प्रीमियर पार पडला. यासह स्पर्धकांचे नावं ही समोर आले आहेत. या शोमध्ये सामील झालेले सर्व स्टार्स हे प्रसिद्ध असून काहींच्या एन्ट्रीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तुम्हालाही ‘बिग बॉस 16’ च्या स्पर्धकांची नावे जाणून घेण्याची उत्सुकता लागलीच असेल. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ते 16 स्पर्धक.



हे आहेत ‘बिग बॉस 16’चे स्पर्धक
‘बिग बॉस’च्या या 16 व्या सीझनमध्ये टीना दत्ता, अब्दुल रोजिक, निमरित कौर अहलुवालिया, मन्या सिंह, सौंदर्या शर्मा, शालीन भानोत, गौतम विग, MC Stan, अंकित गुप्ता, सुंबुल तौकीर, श्रीजीता डे, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, साजिद खान, गौरी नागोरी, अर्चना गौतम या स्पर्धकांचा समावेश आहे.

साजिद खानाची सरप्राईज एंट्री
‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक सीझनला कोणाची न कोणाची सरप्राईज एंट्री होत असते. त्यानुसार या सीझनमध्ये सरप्राईज एन्ट्री ठरली ती साजिद खानची. बिग बॉसच्या निमित्ताने साजिद खान या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आला आहे. यासह टीव्ही मालिका स्टार सुंबूल तौकीर खान, निमरित कौर अहलुवालिया, बिग बॉस मराठी 2 चे विजेते शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिक यांसारख्या स्टार्सनीही बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -