Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमित्रांबरोबर रत्नागिरीला फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मित्रांबरोबर रत्नागिरीला फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गावखडी समुद्रात बुडून (drowning) एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. आकाश पांडुरंग सुतार असे या मृत तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?

पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश सुतार, राजकुमार शेषराव पिटले, ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी रत्नागिरीत पावसला आले होते. यानंतर रविवारी सकाळी पावसपासून जवळच असलेल्या गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी आकाश सुतार हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. तसेच बाकी तिघांना पोहता येत नसल्याने ते समुद्रकिनारी बसून राहिले होते.

यादरम्यान अचानक पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत (drowning) असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. यावेळी राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकाश दिसून आला नाही. यानंतर आकाशच्या मित्रांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यांशी संपर्क केला. यानंतर पोलीस व ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र आकाशचा काही शोध लागला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -