Thursday, April 18, 2024
Homeतंत्रज्ञानआता टिकटॉक सारखे व्हिडीओ पाहता येणार, ‘या’ प्रसिद्ध ॲपने आणलं धम्माल फिचर..

आता टिकटॉक सारखे व्हिडीओ पाहता येणार, ‘या’ प्रसिद्ध ॲपने आणलं धम्माल फिचर..

जगभरात प्रसिद्ध झालेल्या tiktok च्या एका फीचर मुळे अनेक चाहते झाले. शॉर्ट व्हिडिओ सध्या लोकांवर खूपच प्रभाव करत आहे. भारतात बॅन असलेल्या टिकटॉकचे पॉप्युलर व्हिडिओ स्क्रोलिंग हे फिचर इन्स्टाग्राम, युट्युब अशा इतर बऱ्याच ॲप्सने आणले आणि त्यांचे युजर्स वाढले आणि लोकप्रियता देखील अधिक वाढली.

या फिचरमुळे कमीत कमी सेकंदामध्ये व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि लोकांचे मनोरंजन करण्याचा हेतू असतो. आता या शर्यतीत ट्विटर देखील आले आहे किंवा या फीचर्ससह ट्विटर देखील ट्रेंडमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे, असं वाटत आहे. सध्या ट्विटरच्या लेटेस्ट व्हर्जनवर या फीचरचे परीक्षण सुरू आहे, अशी माहीती आहे. लोकांच्या आवडीचे हे फिचर कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

फीचर कसे वापराल..?

ट्विटरच्या फीचरमुळे युजर्सना एक पर्याय निवडून ‘फुल स्क्रीन मोड’वर व्हिडीओ पाहता येणार आहे.

Twitter App उघडून सर्वात शेवटी असणाऱ्या सर्च पर्यायावर क्लिक करा.

सर्वात शेवटी व्हिडीओ फॉर यु (Twitter Video For You Feature) नावाच्या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही टिकटॉकमध्ये ज्याप्रमाणे व्हिडीओ पाहत होता, तसे ट्विटरवर व्हिडीओ पाहू शकाल.

तुम्हाला ‘फुल स्क्रीन इमरसिव मोड’वर व्हिडीओ पाहता येईल आणि एकापाठोपाठ व्हिडीओ पाहण्यासाठी स्क्रोल करत राहा.

विशेष म्हणजे तुम्ही फॉलो करत असलेल्या किंवा नसलेल्या अशा कोणाचेही व्हिडीओ पाहू शकाल. प्रामुख्याने तुम्ही जो कंटेंट पाहता त्याप्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील.

सध्या हे फीचर फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध असून लवकरच आयओएस व्हर्जनमध्येसुद्धा ते लाँच केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -