Saturday, April 20, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : आरके नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली चार दुकानं

कोल्हापूर : आरके नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली चार दुकानं

आरके नगर येथील मुख्य चौकातील चार दुकाने कटवणीच्या सहाय्याने उचकटत धाडसी चोरी करत रविवारी रात्री चोरट्यानी धुमाकूळ घातला.
आरके नगर येथील मुख्य चौकातील तीन पान पट्टयांचे दरवाजे कटावणीने उचकटत पानपट्टी मधील सिगरेटच्या पाकिटांसह सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. तसेच एका मटण विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून त्यातील एक बकरी, दोन सत्तूर ही चोरट्यानी लंपास केले.

भर चौकात एका रात्रीत चोरट्यानी चार दुकाने फोडत धाडसी चोरी केली. चोरी झालेल्या दुकानांपासून हाकेच्या अंतरावर करवीर पोलीस चौकी आहे. मात्र ही पोलीस चौकी अनेक वेळा बंद अवस्थेतच असल्याचे नागरिकांना दिसते. करवीर पोलीस स्टेशन मधून ही पोलीस चौकी अधिकृत नसल्यामुळे येथे कायमस्वरूपी पोलीस नसल्याचे कारण सांगण्यात येते. आरके नगर चौकातील हाय मास्ट लाईट बंद असल्याने हा चौक नेहमी अंधारातच असतो. सीसीटीव्ही कॅमेरा समोर चोरी कॅमेरे बंद आरके नगर मुख्य चौकात चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे कॅमेरे बंद अवस्थेतच आहेत.

सीसीटीव्ही कॅमेरा समोर चोरी ,कॅमेरे बंद आरके नगर मुख्य चौकात चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून हे कॅमेरे बंद अवस्थेतच आहेत. लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या समोरच असलेल्या चार दुकानांमध्ये धाडसी चोरी झाली आहे. एका रात्रीत चार दुकाने फोडत चोरट्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. एका रात्री चार दुकाने फोडून ही याबाबत करवीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झालेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -