Tuesday, April 16, 2024
Homeब्रेकिंगराज्यात आज पुन्हा बरसणार, विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट!

राज्यात आज पुन्हा बरसणार, विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट!

राज्यामध्ये पावसाचा (Maharshtra Rainfall) जोर कमी झाला असून बऱ्याच ठिकाणी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पावसाचा वेग मंदावला असला तरी परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने विभागानं (Meteorological Department) वर्तवली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात पावासाची शक्यता आहे. आज संपूर्ण विदर्भ (Vidharbh) आणि मराठवाड्याला (Marathwada) पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये बुधवारपासून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने आज विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचसोबत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भासह मराठवाड्यावा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा यलो अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -