Saturday, April 20, 2024
Homeतंत्रज्ञानफक्त 50 रुपयांत मोबाईल बनेल वॉटरप्रूफ, मार्केटमध्ये आलंय ‘हे’ नवीन प्रोडक्ट..

फक्त 50 रुपयांत मोबाईल बनेल वॉटरप्रूफ, मार्केटमध्ये आलंय ‘हे’ नवीन प्रोडक्ट..

सध्या बदलत्या हवामानामुळे अनेक ठिकाणी सकाळपासून ऊन व संध्याकाळपर्यंत पाऊस होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात पावसाचे वातावरण अजूनही काही ठिकाणी असल्याने हवामान खाते वेळोवेळी यलो अलर्ट देत असते.

पावसात बाहेर निघताना आपल्या स्मार्टफोनची काळजी घेणे आपल्याला आवश्यक वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कमी खर्चात तुमचा स्मार्टफोन वॉटरप्रूफ कसा बनवायचा आणि पावसाच्या पाण्यामुळे भिजण्यापासून कसा वाचवायचा ते आज सांगणार आहोत. ज्यामुळे आपण पावसामध्ये बिनधास्तपणे स्मार्टफोन वापरू शकतो.

स्मार्टफोन वॉटरप्रूफ बनवण्यासाठी..

▪️ स्मार्टफोन वॉटरप्रूफ बनवायचा असेल तर तुम्हाला वॉटरप्रूफ पाउच किंवा ड्राईव्ह बॅग खरेदी करावी लागेल.

▪️ तुम्हाला हा पाउच दुकानात किंवा ऑनलाईन ई-कॉमर्स साईट्सवर 30 रुपये ते 50 रुपयांच्या जवळपास खरेदी करता येईल.

▪️ सध्या वातावरण बदलामुळे कधी पाऊस येईल सांगता येत नाही, त्यामुळे तुमचा स्मार्टफोन त्या पाउचमध्ये ठेवा आणि या पाउचचे सर्व थर लॉक करा.

▪️ पाउचसोबत असलेली तुम्हाला एक दोरी दिसेल. ती दोरी गळ्यात अडकवा म्हणजे तुम्हाला पाउच वाहतूक करण्यासाठी समस्या वाटणार नाही. यामध्ये तीन ते पाच लॉक असतात.

▪️ पाऊचमध्ये स्मार्टफोन ठेवला आणि कुणाचा फोन जर आला तर तुम्ही त्या प्लास्टिक पाउचच्या वरूनच बोट फिरवून स्मार्टफोन वापरू शकता.

▪️ सर्व लॉक दुमडून शेवटचं लॉक लावलं की थरांची उंचीदेखील कमी होईल. हे लॉक लावताना सर्व लॉक बरोबर असल्याची खात्री करा. आता तुम्ही तुमचा स्मार्टफोन पावसात भिजण्यापासून वाचवू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -