Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics: धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय...

Maharashtra Politics: धनुष्यबाण कुणाचा? शिंदे गट की ठाकरे? निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार! लढाई अंतिम टप्प्यात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचा दसरा मेळावा दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले.



यातच आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोग ७ ऑक्टोबर रोजी निर्णय देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केस सुरू असताना चिन्हाबाबात निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना ७ ऑक्टोबर रोजी आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. अंधेरीची पोटनिवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे.

अंधेरी पूर्वच्या जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, त्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो, याची उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -