Thursday, March 28, 2024
Homeब्रेकिंगDasara Melava : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी सोडलं मैदान

Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी सोडलं मैदान

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचाबांद्रा BKC मैदानावर. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंचे भाषण झाल्यानंतर भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना शिंदे यांनी अनेक आरोप केले. दरम्यान या मेळाव्यासाठी बस मधून राज्यभरतून कार्यकर्ते हे मुंबईत दाखल झाले होते.



एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह भरपूर होता. मात्र, शिंदे यांचे भाषण लांबल्याने अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांनाच निघून गेल्याने मैदान रिकामे पडले होते.

शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेसाठी अनेक नागरिक हे सकाळपासून हे मैदानात आले होते. त्यामुळे अनेक नागरिक हे कंटाळले होते. माध्यमांच्या प्रतिनिधीनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले की कुणाच्या सभेला आला आहात, याचे उत्तर देखील त्यांना देता आले नाही. यामुळे सकाळपासून बसलेले अनेक नागरिक हे कंटाळले. मुख्यमंत्री यांचे भाषण उशिरा सुरू झाल्याने तो पर्यंत त्यांचा बसण्याचा धीर हा टिकून राहिला नाही. त्यांचा संयम सुटल्याने अनेक नागरिक हे मैदानातून उठून बाहेर पडले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पण, त्यांना कुठल्याची प्रकारची दाद न देता बाहेर गावरून आलेले अनेक जण हे मैदानाबाहेर पडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांनाच योग पडले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -