कोल्हापूर : महाद्वाररोड चार दिवस वाहतूकीसाठी बंद

दिपावली सणानिमित्त महाव्दार रोडवर होणारी गर्दी लक्षात घेवून शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. 22 ते 26 ऑक्टोबर या दरम्यान महाद्वार रोड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरुन प्रवेश बंद केला आहे.

गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात महाद्वाररोड वाहतूकीसाठी काही कालावधीकरीता बंद करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर दिवाळी खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेवुन तसेच सुटय़ांच्या काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेवून शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत.

वळविलेला मार्ग…

सरस्वती टॉकीज चौकातून ताराबाई रोडने महाव्दार रोडकडे येणारी वाहतूक पुढे न जाता बाबू जमाल दर्गा किंवा अर्धा शिवाजी महाराज पुतळा मार्गाने जाता येणार आहे.
डावीकडे वळणेस बंदी, ताराबाई रोडने महालक्ष्मी चौक येथून डावीकडे वळण्यास मज्जाव आहे. महाव्दार रोडवर येणाया सर्व पोट रस्त्यावरून डावीकडे व उजवीकडे वळण्यास बंदी आहे.

Join our WhatsApp group