मला वाटलं माझं आयुष्य संपलं’, कतरिना कैफचा धक्कादायक खुलासा


कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. अशा परिस्थितीत आता कतरिना कैफला तिच्या करिअरमधील कठीण दिवस आठवले आहेत. जॉन अब्राहमच्या ‘साया’ या चित्रपटातील शॉटनंतर तिला काढून टाकण्यात आल्याचं तिने सांगितलं आहे. त्यावेळी कतरिना कैफ खूपच तुटली होती. ती कधीच कलाकार होऊ शकणार नाही असं तिला वाटत होतं. आणि त्याचवेळी तिच्यासोबत काहीच चांगलंही घडत नव्हतं.कतरिना कैफने तिच्या एका मुलाखतीत हे सांगितलं आहे. अभिनेत्रीने अलीकडेच बॉलिवूड बबल या इंग्रजी वेबसाइटशी संवाद साधला. यादरम्यान कतरिना कैफ म्हणाली, ‘अनुराग बासू आणि जॉन अब्राहमच्या ‘साया’ चित्रपटातून मला काढून टाकण्यात आलं होतं. मी एकच शॉट दिला, एकही दिवस शूट केलं नाही. आणि मला सिनेमातून काढून टाकलं त्यावेळी मला वाटलं की, माझं आयुष्य संपलं आहे. मला वाटलं माझं करिअर संपलं.अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘एक कलाकार म्हणून मला वाटतं की प्रत्येकाला नकारांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून जर तुम्हाला कलाकार व्हायचं असेल तर तुम्हाला ती लवचिकता विकसित करावी लागेल. जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा लोकांनी मला सांगितलं की तू कलाकार होऊ शकत नाही आणि तुझ्यामध्ये काहीही चांगलं नाही. मी तेव्हाही खूप रडले, म्हणून रडणं मदत करतं, परंतु नंतर तुम्ही तुमच्याकडे असलेली दृष्टी धरून राहता, तुम्ही कठोर परिश्रम करता त्यामुळे तुम्हाला लवचिक असावं लागतं.

याशिवाय कतरिना कैफने इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला सांगूतो की, साया हा सुपरनॅचरल फॅन्टसी रोमँटिक थ्रिलर चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं होतं आणि महेश भट्ट यांनी निर्मिती केली होती. हे हॉलिवूड चित्रपट ड्रॅगनफ्लायचं रूपांतर होतं. साया या चित्रपटात जॉन अब्राहम, तारा शर्मा, महिमा चौधरी, जोहरा सहगल आणि राजेंद्रनाथ जुत्शी मुख्य भूमिकेत होते.

Join our WhatsApp group