इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या लाक्षणिक उपाेषणादरम्यान चुकीच्या माहितीच्या आधारे आणि अर्वाच्च भाषेत आमदार राहुल आवाडे यांची नाहक बदनामी करण्यात आली. या प्रकरणी आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने संबंधितांना कायदेशीर नाेटीस बजावण्यात आली आहे.
1 सप्टेंबर 2026 राेजी इचलकरंजी महानगरपालिका प्रवेशद्वारात इचलकरंजी शहर महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपाेषण करण्यात आले हाेते. त्यामध्ये मदन कारंडे, उदयसिंग पाटील, संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, सचिन राणे, रणजीत जाधव, अमरजीत जाधव, संजय कांबळे, स्मिता तेलनाडे, यास्मिन तासगांवे, संगीता आलासे, पद्मा सावरतकर, सयाजी चव्हाण, शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश माेरबाळे, सदा मलाबादे, नितीन काेकणे, संभाजी सूर्यवंशी, शशिकांत देसाई, रवी गाेंदकर, प्रताप पाटील, शिवाजी साळुंखे आदी उपस्थित हाेते. लाक्षणिक उपाेषणावेळी आमदार राहुल आवाडे यांच्या विराेधात घाेषणाबाजी करण्यात आली. आमदार राहुल आवाडे यांची जनमाणसांमध्ये बदनामी करण्याच्या हेतुनेच चुकीच्या माहितीच्या आधारे आणि अर्वाच्च भाषेत घाेषणाबाजी केली गेली. लाेकशाही आंदाेलन करणे हे चुकीचे नसून चुकीच्या व अपुèया माहितीच्या आधारे एखाद्याची व्यक्तीगत नाहक बदनामी करणे चुकीचे आहे. याची दखल घेऊन आमदार आवाडे यांनी उपराेक्त सर्वांना कायदेशीर नाेटीस बजावली असून संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दिवाणी व ाैजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
