Monday, September 25, 2023
Homeब्रेकिंगराज्यात उद्यापासून कडक निर्बंध : वाचा काय सुरु आहे बंद

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध : वाचा काय सुरु आहे बंद


ताजी बातमी/ ऑनलाइन टीम

महाराष्ट्रभरात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध घालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद राहतील.

शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. जारी करण्यात आलेली नियमावलीमध्ये शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी आहे. मुंबई लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू.

रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू

मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार

रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू

२ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ

राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी

खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील

लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी

 हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा

२४ तास सुरु राहणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत

दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई

राज्यात प्रवेश करताना लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक

दुकाने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी दोन्ही डोस बंधनकारक.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र