Saturday, September 30, 2023
Homeकोल्हापूरकार चाेरणार्‍या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

कार चाेरणार्‍या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

आलिशान मोटर कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. पाच कोटी पाच लाख रुपये किंमतीच्या 31 आलिशान मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार ( वय 42 राहणार क्रॉस मशीद गल्ली गांधीनगर जिल्हा बेळगाव ), यश प्रशांत देसाई ( 26 रा. बोरमाळ शहापूर जिल्हा बेळगाव), खलील महंमद लियाकत सारवान ( वय 40 राहणार सुभाषनगर जिल्हा बेळगाव ) यांचा समावेश आहे.

आंतरराज्य टोळीने नवीन आणि महागड्या आलिशान मोटारी चोरून कारच्या नंबर मध्ये खाडाखोड व फेरबदल करून त्याची विक्री केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.  महाराष्ट्र कर्नाटक गोव्यासह मणिपूर मधील गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक प्रमोद जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र