Monday, October 2, 2023
Homeब्रेकिंगगर्दी होत असेल तर दारूची दुकानेही बंद करावे लागतील . राजेश टोपे

गर्दी होत असेल तर दारूची दुकानेही बंद करावे लागतील . राजेश टोपे

ताजी बातमी ऑनलाईन टीम
गर्दी होत असेल तर दारुची दुकानेही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्याने नवे निबंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या हितासाठी निबंध पाळणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्याचे आणि लसीकरण करून घेण्याचे
आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या २ ते ३ दिवसांमध्ये दुप्पट होती. काल पर्यंत ४० ते ४५ हजार रुग्णांची वाढ होत असल्याने असे निर्बंध लावणे आवश्यक होते असेही टोपे म्हणाले.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र