Wednesday, September 27, 2023
HomenewsSharad Pawar : ईडीच्या कारवायांमुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा

Sharad Pawar : ईडीच्या कारवायांमुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा


राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शंभर कोटी रुपयांच्या खंडणी घोटाळ्यात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी, ईडीच्या कारवायांमुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचे म्हटले आहे

यवतमाळ– वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या काही संस्थांवर सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना पवारांनी, ईडी यंत्रणा कुणाच्या मागे कशी लागेल हे काही सांगता येत नाही, असे सांगत खोचक टीका केली. ईडीने त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले.

ईडीच्या कारवाईचा प्रश्न संसदेत मांडणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गैरव्यवहार प्रश्नी कमिशनकडे तक्रार करता येते. राज्य सरकारचे गृहखातेही आहे. तपासाची यंत्रणा असताना ईडीचा हस्तक्षेप होत आहे. यामुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

आरबीआयच्या नव्या धोरणाला विरोध…
रिझर्व्ह बँकेचे जे काही नवीन धोरण आहे त्याला शरद पवारांनी विरोध दर्शविला आहे. नागरी सहकारी बँका बंद करण्याचे आरबीआयचे नवे सूत्र आहे, असे वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केले आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र