Thursday, May 30, 2024
Homenewsअल्पवयीन मुलींना निव्रस्त्र फिरविले; मध्यप्रदेशात पावसासाठी अघोरी प्रथा

अल्पवयीन मुलींना निव्रस्त्र फिरविले; मध्यप्रदेशात पावसासाठी अघोरी प्रथा


मध्यप्रदेशात दुष्काळी भागात पाऊस न पडल्याने गाववाल्यांनी अल्पवयीन मुलींना निव्रस्त्र करून फिरविले. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातली दमोह जिल्ह्यातील दुष्काळी भागातील बनिया गावात ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वरुणदेवाला खूश करण्यासाठी बुंदेलखंडांतील काही गावांती अशी प्रथा आहे.
या प्रथेसाठी अल्पवयीन मुलींना नग्न करून त्यांच्या खांद्यावर काठी दिली जाते. या मुलींसोबत भजन गात गावकरी सहभागी होतात.


गावातून चालत मंदिरात जातात. गावातून मुली गावकऱ्यांकडून धान्य गोळा करतात.
हे धान्य देवळात जमा केले जाते. त्यानंतर तेथे भंडारा केला जातो. या प्रथेनुसार अल्पवयीन मुलींना निव्रस्त्र फिरविले.


बनिया गावात अशी घटना घडल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिस अधीक्षक डी. आर.
तेनीवार यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेची पोलिस चौकशी करत असल्याचे ते म्हणाले.
मात्र, याप्रकरणी कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे ते म्हणाले.


याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आदिवासी मुलींना निर्वस्र होण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडलं असेल तर नक्कीच या प्रकाराविरोधात कारवाई केली जाईल.
मात्र, संबंधित मुलींचे कुटुंबीयही या प्रथेत सहभागी झाले. त्यामुळे, एकाही गावकऱ्यानं या प्रथेविरोधात तक्रार दाखल केलेली नाही.


अशावेळी गावाकऱ्यांचं केवळ प्रबोधन करुन त्यांना या अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.’
बालहक्क आयोगाचा हस्तक्षेप
‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईटस’ कडून एका पत्राच्या माध्यमातून दमोह जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


दमोह जिल्ह्यात घडलेल्या या अमानवीय घटनेत कथितरित्या अल्पवयीन मुलींना निर्वस्र फिरताना पाहिलं गेले आहे.
आदिवासी समाजाशी संबंधित या मुलींनी जवळच असलेल्या मंदिरात निर्वस्त्र देवीची प्रार्थनाही केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -