प्रत्येक नोकरी करण्याऱ्या व्यक्तीने सॅलरी खातं हे नक्कीच असतं आणि दरमहा तुमचा पगार या खात्यात येतो. बऱ्याचदा तुमची कंपनी डिसाइड करते की, तुमचं कोणत्या बँकेत त्यांना अकाउंट ओपन करुन द्यायचे आहे. या शिवाय अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना काही बँकेचे पर्याय देतात त्यानुसार ते आपली बँक निवडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये सुरू केल्यास तुम्हाला कोण कोणते फायदे मिळणार? याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट – sbi.co.in नुसार, एसबीआय वेतन खात्याच्या फायद्यांमध्ये विमा फायदे तसेच वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, कार कर्ज, शिक्षण कर्ज इत्यादींवर सूट आहे. या व्यतिरिक्त, इतर काही फायदे आहेत ज्याबद्दल SBI वेतन खातेधारकाला माहिती असावी.
एसबीआय वेतन खात्याचे 5 फायदे
जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल तर बँक तुम्हाला अनेक विशेष सुविधा बँक देते.
1. मृत्यूचा लाभ मिळेल
जर तुमचे SBI मध्ये वेतन खाते असेल, तर अपघाती मृत्यूनंतर तुम्ही 20 लाखांपर्यंत कवचे हक्कदार आहात. म्हणजेच SBI खातेदाराच्या मृत्यूचा लाभ त्याच्या नॉमीनिला देते.
2. हवाई अपघाती मृत्यू कव्हर
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट – sbi.co.in नुसार, जर ग्राहकाचा हवाई अपघाती मृत्यू झाल्यास, एसबीआय वेतन खातेधारक 30 लाखांपर्यंतच्या हवाई अपघात विमा कव्हरसाठी पात्र आहे.
3. कर्ज प्रक्रिया शुल्कावर 50% सूट
एसबीआय वेतन खातेधारकांना पर्सनल लोन, होम लोन, कार लोन इत्यादी कोणत्याही कर्जावर 50%च प्रोसेसिंग फी आकारली जाईल.
4. ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असेल
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या पगार खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील प्रदान करते. एसबीआय वेतन खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत दोन महिन्यांच्या पगारापर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळतो.
5. लॉकर फी माफ
SBI आपल्या ग्राहकांना पगार खात्यावरील लॉकर शुल्कावर 25 टक्के सूट देते. म्हणजेच, जर तुमचे SBI मध्ये वेतन खाते असेल, तर तुम्हाला त्याचे जबरदस्त फायदे मिळतात