Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रधरण ११ जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद

धरण ११ जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार चांदोली धरणावर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंगळवार (ता.11) पासून पूढील आदेश होईपर्यंत पर्यटकांसाठी हे धरण बंद राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन चांदोली धरणाचे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता चांदोली धरणावर ही पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -