Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दिलासादायक…लसीकरणाला वेग; 15-18 वयोगटातील 50 टक्के तरुणांना मिळाला पहिला डोस

कोल्हापूर : दिलासादायक…लसीकरणाला वेग; 15-18 वयोगटातील 50 टक्के तरुणांना मिळाला पहिला डोस

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सुरू करण्?यात आलेल्या लसीकरण मोहिमेने केवळ आठ दिवसांत सोमवारी एक लाखाचा टप्पा पार केला. त्यामूळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक मुलांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसर्‍या डोससाठी 28 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आल्याने लसीकरणाची सध्याची गती पाहता फेब्रुवारी अखेरपर्यंत 15 ते 18 वयोगटातील लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लसीकरणाला पहिल्या दिवसापासून मुलांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांत या वयोगटातील लसीकरणाने 50 हजारांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर लसीकरण केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली. प्रत्येक शाळा व कॉलेजना पत्र पाठवून लसीकरणास पात्र असणार्‍या मुलांची संख्या पाठविण्याच्या सूचना दिल्या. याची तत्काळ अंमलबजावणी शाळा व कॉलेजनीदेखील केली. त्यामुळे लसीकरण केंद्रे वाढविण्यास सुरुवात करण्यात आली. लसीकरणाचा सोमवारी आठवा दिवस होता.आजपर्यंत 1 लाख 71 हजार 29 मुलांपैकी 1 लाख 11 हजार 9 मुलांनी लस घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -