जिल्ह्यात आज सकाळी जोरदार पाऊस पडला. गोविंदपूर नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद झाला आहे. तर चामोर्शी-घोट मार्गावर काही ठिकाणी झाडे तुटून पडल्याने वाहतूक खोळंबली होती.
आज सकाळी गडचिरोलीसह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गोविंदपूरनजीकच्या नाल्यावर पुलाचे काम सुरु असून आहे. दळणवळणासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, आज सकाळपासून या रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे गडचिरोली-पोटेगाव-कुनघाडा-चामोर्शी या मार्गाने वाहतूक वळती करण्यात आली आहे.