Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरसीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर

सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर


तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या ( सीईटी परीक्षा ) तारखा जाहीर झाल्या आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी तारीख जाहीर केली आहे.


२०२१-२२ या शैक्षणिक वर्ष यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील,
असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंगळवारी सांगितले.

सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यभरातील ८ लाख, ५५ हजार, ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सीईटी परीक्षेसाठी राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.


मंत्री सामंत म्हणाले, ‘सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी आली असली तरीही धोकाय कायम आहे.
त्यामुळे सीईटी परीक्षेदरम्यान करोना नियमांचे पालन करावे लागेल. तसेच परीक्षांसाठी दररोज ५० हजार संगणक उपलब्ध करण्यात येतील.
तसेच प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्यात येईल.


तर, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश प्रक्रिया १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येईल.’
बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे.


त्यापुर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला होता.
मात्र, सीईटी परीक्षा तारीख जाहीर झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.


मात्र, पुढील काही दिवसांत सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -