वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बेकायदेशीर केबिन्स, गाड्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी शहरातील मुख्य रस्ता असणार्या भाऊसिंगजी रोडवर कारवाई करून 42 गाडे, केबिन्स हटविण्यात आल्या. जेसीबी, ट्रॅक्टरच्या मदतीने करण्यात आलेल्या कारवाईवेळी पोलिस बंदोबस्तही तैनात होता.
महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरात कारवाईचा बडगा उगारला आहे. काही दिवसांपूर्वीच खासबाग खाऊ गल्लीमधील बेकायदा केबिन्सवर कारवाई झाली. या पाठोपाठ आता शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात येत आहे. मंगळवारी सीपीआर चौक ते महापालिका चौक मार्गावरील बेकायदा केबिन्सवर कारवाई झाली.