Saturday, December 21, 2024
Homeकोल्हापूरसीपीआर मधील शंभरवर आरोग्य कर्मचारी सर्दी-तापाने बेजार

सीपीआर मधील शंभरवर आरोग्य कर्मचारी सर्दी-तापाने बेजार

कोल्हापुरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेविषयी नागरिकांत अद्यापही गाफीलपणा दिसत असला, तरी या लाटेने जिल्ह्याचे कोव्हिड रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सीपीआर रुग्णालयाला तडाखा दिला आहे. या रुग्णालयातील सुमारे 100 वर कोरोना योद्धे सध्या कोरोनाची शिकार बनल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. यापैकी 31 योद्ध्यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, 16 जण रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत.

उर्वरितांनी सध्या उपचारासाठी गृह विलगीकरणाचा मार्ग स्वीकारला असून, आरोग्य कर्मचार्‍यांना होणार्‍या कोरोना संसर्गबाधेचा आलेख विचारात घेता आगामी आठवड्यात आणखी काही आरोग्य कर्मचारी बाधित म्हणून समोर येतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सीपीआर रुग्णालयातील कोरोनाचे संक्रमण वेग पकडते आहे.

पहिल्या दोन लाटांमध्ये ज्यांनी कोरोनाविरुद्ध लढताना यशस्वी मुकाबला केला असे डॉक्टर्स, विभागप्रमुख सध्या सर्दी-तापाने फणफणाताहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष ते अंतिम वर्षापर्यंत शिकणारे 29 विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. याखेरीज रुग्णालयातील काही निवासी वैद्यकीय अधिकारी, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, परिचारिका यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

सर्दी, ताप, खोकला आणि घशात खवखव अशी सर्वसाधारण लक्षणे या वैद्यकीय कर्मचार्‍यांमध्ये आहेत. डिसेंबरच्या उत्तरार्धात हे रुग्ण बाधित होण्यास सुरुवात झाली होती. प्रामुख्याने राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ही लक्षणे आढळली. या बाधित विद्यार्थ्यांचाच आकडा आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -