Thursday, October 3, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : व्यापार्‍यांना पाचशे रुपयांपासून ५० हजार रुपयांचा दंड कशासाठी?

कोल्हापूर : व्यापार्‍यांना पाचशे रुपयांपासून ५० हजार रुपयांचा दंड कशासाठी?

कोव्हिड नियमांचे शंभर टक्के पालन करूनच कोल्हापुरातील व्यापारी व्यवसाय करत आहेत. पण रस्त्यावरच्या गर्दीला दुकानासमोरील गर्दी म्हणून दंड केला जात आहे. कोव्हिड नियमांचा भंग केल्यास 500 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. दिवसभरातील कमाई हजार रुपये व दंड दहा हजार रुपये अशी स्थिती असल्याने व्यापारी वर्गातून संताप व्यक्‍त होत आहे.जर कोरोनामुळे लॉकडाऊन झाला तर महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असणार आहे. याची जाणीव असल्याने शासनाने तिसरी लाट आली तरी लॉकडाऊन न करता केवळ कडक निर्बंध लागू केले आहेत. व्यापारी वर्गानेही या नियमांचे स्वागत केले.

नियमांचे पालन करून व्यापार्‍यांनी व्यवसाय सुरू केला. पण महापालिका व पोलिसांच्या अरेरावीपणाला व्यापारी वर्ग कंटाळला आहे. रस्त्यावर जरी गर्दी दिसली तरी ती दुकानासमोर झाली, असे सांगून व्यापार्‍यांना दंड आकारला जातो. कपड्यांच्या दुकानात एका कुटुंबातील चार लोक आले तर कामगार धरून पाच ते सहा लोक होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -