Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रअडीच लाखांहून अधिक जणांना दुसर्‍या डोसचा विसर

अडीच लाखांहून अधिक जणांना दुसर्‍या डोसचा विसर

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. शासकीय रुग्णालयात ही लस मोफत मिळते. तरी देखील जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 540 जणांनी अद्याप एकही डोस घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

20 लाख 4 हजार 970 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर 2 लाख 58 हजार 41 जणांचा 84 ते 112 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांना दुसर्‍या डोसचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. ओमायक्रॉन वाढू नये यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -