ताजी बातमी ऑनलाईन टीम
भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या 28 किलो सोन्याच्या तसेच 1000 किलो चांदीच्या वस्तू वितळवण्यात येणार आहेत. चार पद्धतीने या सोन्याचा विनियोग करण्यात शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार काही शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे पाच सदस्य यांच्या उपस्थितीत या सोन्याच्या व चांदीच्या वस्तू वितळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची सर्व सदसीय बैठक बुधवार, दि. 12 रोजी पार पडली. या बैठकीत सोने-चांदी वितळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.या बैठकीस सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, भास्कर गिरी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, गेल्या 1985 सालापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचे अनेक लहान-मोठे दागिने मंदिर समितीकडे जमा आहेत. यामध्ये सोन्याचे लहान-मोठे 28 किलो तर 1000 किलो चांदीचे दागिने आहेत. हे सोने-चांदीचे दागिने मंदिरात अडगळीत पडून आहेत. या सोन्या-चांदीच्या वस्तूंचे वजन 28 किलो आहे. तर चांदीच्या वस्तूंचे वजन 1 हजार किलो आहे. सोन्याच्या वस्तू वितळवून नवीन दागिने (अलंकार) तयार करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्याकरिता शासनाने मंंजुरी दिलेली आहे.
औसेकर महाराज म्हणाले, याचबरोबर शासनाने असेही सूचित केले आहे की, मंदिर समितीला हे सोने विकता येईल. या सोन्याचे नवीन दागिने देखील तयार करता येतील. त्याचबरोबर सोने वितळवून त्याच्या वीटा तयार करता येतील व तयार केलेल्या सोन्याच्या विटा बँकेत ठेवून त्याचे व्याज मंदिर समितीला घेता येईल. या चार पद्धतीने सोन्याचा विनियोग करण्यात शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार काही शासकीय अधिकारी, मंदिर समितीचे पाच सदस्य यांच्या उपस्थितीत या सोन्याच्या व चांदीच्या वस्तू वितळवण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणीचे २८ किलो दागिने वितळविण्यास शासनाची मान्यता
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -