Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र"साहेब, माझा नवरा मला 'बहीण' म्हणून हाक मारतो", बायको गेली पोलिसांत

“साहेब, माझा नवरा मला ‘बहीण’ म्हणून हाक मारतो”, बायको गेली पोलिसांत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

“साहेब, माझा नवरा मला बहीण म्हणून हाक मारतो, असा आरोप करत गाजियाबादच्या इंदिरापूरम पोलीस ठाण्यात बायकोने तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, माझ्या पतीचे दुसऱ्या स्रीबरोबर संबंध आहेत. त्यामुळेच माझा नवरा मला बहीण म्हणून हाक मारतो. जेव्हा त्याला विरोध करतो तेव्हा तो शांत राहण्याची धमकी देतो”, असं त्या तक्रारीत म्हटलं आहे.

साहेब यांनी (पोलीस अधिकाऱ्यांनी) त्या नवरा-बायकोच्या काऊंसिलिंगसाठी हे प्रकरण महिला ठाण्यात पाठविण्यात आले आहे. इंदिरापूरममध्ये संबंधित महिला आपल्या कुटुंबासोबत राहते. त्यांच्या लग्नाला १४ वर्षं झाली आहेत. तिचा नवरा बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनियर आहे. नवरा जेव्हा घरी असतो तेव्हा तो मला बहिणीसारखं रहा, असं सांगतो, असा आरोप बायकोने केली.

बहीण म्हणण्यापासून महिला जेव्हा नवऱ्याला विरोध करते, तेव्हा तो शांत राहण्यासाठी दबाव टाकतो. जेव्हा महिलेने ही बाब माहेरच्या लोकांना सांगणार असल्याचे सांगितले तेव्हा नवऱ्याने घरातून बाहेर काढून टाकण्याची धमकी दिली. मुलांनी वडिलांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.

आता संबंधित महिलेने सांगितले की, जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध आहेत. शेवटी पतीच्या वागण्याला वैतागून महिलेने बुधवारी इंदिरापुरम ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघांचे कौन्सलिंग करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना महिला ठाण्यात पाठविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -