Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी : उद्धव ठाकरे

कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी : उद्धव ठाकरे

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय गुरूवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाक होते.

शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी वार्षिक करातून १०० टक्के करमाफी करण्यात येईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले.

मात्र, ज्या स्कूल बस प्रकारातल्या वाहनांनी वरील कालावधीसाठीचा कर भरला असेल तर अशा कराचे महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९९८ मधील कलम ९ (४ अ) नुसार आगामी काळात समायोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -