Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनसोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पुष्पा’चे सुपरहिट श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘पुष्पा’चे सुपरहिट श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन

ताजी बातमी ऑनलाइन टीम

बॉक्स ऑफिसवर साऊथ सुपरस्टार अर्जुन अल्लू आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने विक्रमी कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर सोशल मीडियावर सुद्धा या चित्रपटाच्या ‘श्रीवल्ली’ गाण्याने सर्वांवर आपली जादू पसरवली आहे. जर तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर मोबाईल चाळताना एकदा तरी हे सुपरहिट गाणे तुमच्या नजरेस पडले असेल. सध्या हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. एखादे गाणे गाजले आणि त्याचे मराठी वर्जन आले नाही, असे कधी झाले आहे का ? ‘श्रीवल्ली’ गाण्याची वाढती क्रेझ पाहून या गाण्याचे आता मराठी व्हर्जन सोशल मीडियावर धडकले आहे. साऊथ इंडियन गाण्याला मराठी ठेक्यांचा तडका ऐकून तुम्ही सुद्धा दंग व्हाल, एवढे मात्र नक्की.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचे मराठी व्हर्जन गाणारा पुण्यातील ट्रॅफिक हवालदार आठवतो आहे का? या ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचे वेगवेगळ्या भाषेतील व्हर्जन सॉंग देशभरात येत असताना या पुणेकर ट्रॅफिक हवालदाराने मराठी व्हर्जन तयार करून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आता ‘पुष्षा’ चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याचा फिवर सोशल मीडियावर चढलेला असून या पुणेकर ट्रॅफिक हवालदाराने या गाण्यावर सुद्धा मराठी व्हर्जन तयार केले आहे. ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या या मराठी व्हर्जनमुळे हा ट्रफिक हवालदार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या गाण्याचे मराठी व्हर्जन पुणे पोलिस दलात ट्रॅफिक पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या आतिश खराडे यांनी गायले आहे. ‘श्रीवल्ली’ या साउथ गाण्याला मराठी ठेक्यांचा तडका देत त्यांनी हे गाणे गायले आहे. श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जन सॉंगचा एक व्हिडीओ त्यांनी आपल्या AK Police नावाच्या युट्यूब चॅनवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्वतः त्यांच्या ट्रॅफिक हवालदाराच्या युनिफॉर्ममध्ये दिसून येत आहे. तसेच ‘श्रीवल्ली’चे मराठी व्हर्जन ते स्वतः एन्जॉय करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. हे मराठी व्हर्जन त्यांनी फक्त गायले नाही तर व्हिडीओ सुद्धा तयार केला आहे. या व्हिडीओमधून एक मराठमोठी लव्हस्टोरी सुद्धा दाखवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -