बेळगाव जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना बाधक असणार आहे, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्याप्रमाणेच आता चित्र निर्माण होत असून, जिल्ह्यात तब्बल 218 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये कित्तूर येथील सैनिक शाळेतील 138 विद्यार्थ्यांचा समावेश असून, इतर ठिकाणच्या 80 विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या 218 विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाढत्या संसर्गाबाबत बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ म्हणाले, कोरोना वेगाने फैलावत आहे. केवळ दहा दिवसांत हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा लहान मुलांतही कोरोनाचा संसर्ग दिसून येत आहे.