Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रबुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही बुडाला

बुडणाऱ्याने मिठी मारली अन्‌ त्याच्यासह पट्टीचा पोहणाराही बुडाला

चिखलठाण (ता. करमाळा) येथे उजनी धरण यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकासह एक मच्छिमार असे दोघे बुडाले. शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. गावातील तरुण आणि मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली आहे.ऐन संक्रांत सणादिवशी ही दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. चिखलठाण (ता. करमाळा) येथे उजनी धरण येथे फिरण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील युवकाचा होडीतून तोल गेला.

त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मच्छीमार तरुणाने उडी मारली. बुडणाऱ्याने मच्छीमाराला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली आहे. येथील समीर याकूब सय्यद (वय-29) हा उजनी धरणात मासेमारीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे मुंबई येथील पाहुणे आले होते.

सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी उजनी धरणात निघाले असताना मुंबई येथील चार पाहुणे त्याच्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणातील पाण्यात फेरफटका मारताना अल्ताफ इकबाल शेख (वय 18, रा. मुंबई) या युवकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला.

त्याला वाचवण्यासाठी समीर याने पाण्यात उडी मारली. समीर मासेमारी करणारा पट्टीचा पोहणारा होता; मात्र अल्ताफने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. होडीतील इतरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूला मारेमारी करणारे मच्छीमार आले. तोपर्यंत दोघे बुडाले होते. मच्छीमारांना शोध सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -