Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रहोम टेस्टिंग अँटीजेन किटची लपवाछपवी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जारी केली नवी नियमावली

होम टेस्टिंग अँटीजेन किटची लपवाछपवी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जारी केली नवी नियमावली

मुंबईसह उपनगरात घरगुती किंवा रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापर वाढला आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटत नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो. खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. घरगुती कोरोना टेस्टिंग किट किंवा रॅपिड अँटीजेन किट उत्पादक आणि विक्रेत्यांना किटच्या विक्री संदर्भातील सर्व तपशील महापालिकेला देणे बंधनकारक आहे. महापालिकेने कोरोना सेल्फ टेस्टिंग किटच्या वापराबाबतची नवी नियमावली जाहीर केली आहे.

होम टेस्टिंग अँटीजेन किटचे उत्पादक, वितरकांनी क्रमांकाची माहिती द्यावी लागणार
– मुंबईतील केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर्स, डिस्पेन्सरी यांना विक्री केलेल्या किटचे फॉर्म A मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेलवर आयडी ही माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक.
केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर, दवाखाने ग्राहकांना विकल्या गेलेल्या होम टेस्टिंग अँटीजेन किटचा तपशील ‘बी’ फॉर्ममध्ये आयुक्त, FDA यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला दररोज ईमेल आयडीवर द्यावा लागणार
– केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर, दवाखाने होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या खरेदीदाराला बिल जारी करतील आणि ज्या ग्राहकांना होम टेस्टिंग अँटीजेन किट्स विकल्या जातात त्यांची नोंद खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये ठेवली जाईल.
केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर, डिस्पेन्सरी यांनी दररोज संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आयुक्त, FDA यांना ईमेल whogmp.mahafda@gmail.com वर तसेच एपिडेमियोलॉजी सेल, MCGM यांना mcgm या ईमेल आयडीवर शेअर केली जाईल.


– आयुक्त, FDA हे मुंबईतील खरेदार नागरिक सर्व केमिस्ट,फार्मसी, मेडिकल स्टोअर्स आणि वितरकांच्या होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या वितरण आणि विक्रीवर देखरेख ठेवतील.
आयुक्त, FDA यांच्याकडून केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर, डिस्पेन्सरी यांना किट खरेदी करणार्‍या व्यक्तीला दिलेल्या ॲपवर चाचणी अहवाल कळवण्यास सांगितले जाईल.
– उत्पादक, वितरक, केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर्स इत्यादींकडून होम टेस्टिंग अँटीजेन किट्सशी संबंधित डेटा इमेलद्वारे प्राप्त केला जाईल, त्यावर एपिडेमियोलॉजी सेल, MCGM द्वारे परीक्षण केले जाईल आणि पुढील आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संबंधित वॉर्डकडे पाठवले जाईल.
– त्या व्यक्तीने ICMR वेबसाइट, अॅपवर निकाल अपलोड करावा आणि रुग्णाच्या किंवा संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल, याची खात्री करण्यासाठी वॉर्ड टीम काम करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -