Monday, October 7, 2024
Homeसांगलीकोयत्याच्या धाकाने भर दिवसा वृद्धेस लुटले

कोयत्याच्या धाकाने भर दिवसा वृद्धेस लुटले


सांगली येथील श्रीमती नलिनी महारुद्र नाडकर्णी (वय 87, रा. गीता दर्शन, नाडकर्णी हॉस्पिटल, सागंली- मिरज रस्ता) यांना त्यांच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून चोरी करण्यात आली. त्यांच्या घरातून रोख 40 हजार रुपये आणि सोन्याचे पंधरा तोळे दागिने लंपास करण्यात आले. मध्यवस्ती मध्ये भर दिवसा हा प्रकार घडला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.


दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तिघा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून 6 लाख 37 हजार 500रुपयाचा मुद्देमाल लंपास झाल्याची नोंद केली आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाडकर्णी या नाडकर्णी हॉस्पिटल शेजारीच घरामध्ये एकट्याच राहतात. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तोंडाला बांधलेले तिघेजण त्यांच्या घरी आले, त्यांनी दरवाजा वाजवला. त्यावेळी नाडकर्णी यांनी त्यांना दवाखाना बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर तिघांपैकी एक जण बंगल्याभोवती फिरू लागला. त्यावेळी हे तिघे काय करीत आहेत पाण्यासाठी नाडकर्णी या बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला. त्यावेळी संशयितांनी दरवाजा जोरदार ढकलला .त्यात नाडकर्णी या खाली पडल्या.

त्यातील एकाने नाडकर्णी यांच्या गळ्याजवळ कोयत्या लावला. आरडा- ओरडा केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इतर दोघांनी बेडरूम मध्ये असलेले कपाट उचकटले. त्यामधील रोख 40 हजार रुपये, एक मोबाईल आणि पंधरा तोळे सोन्याचे दागिने घेऊन काहीवेळातच पोबारा केला. तिघे जण दुचाकीवरून लगेच पसार झाले. त्यानंतर नाडकर्णी यांनी ही माहिती त्यांच्या मुलास दिली. या प्रकाराबाबत मुलाने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी पंचनामा केला. डॉग पथकाच्या सहाय्याने परिसरात चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

त्याशिवाय दरवाजे, कपाट याचे ठसे घेण्यात आलेले आहेत. पोलिस उपाधीक्षक अजित टिके, पोलिस निरिक्षक एस. व्ही. गुरव यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी दोन संशयिताकडे तपासणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यात लुटमार, चोर्या याचे प्रकार वाढले आहेत. भर दिवसा लुटण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. लुटमार करणार्या टोळ्यांवर कारवाई करा, अशी मागणी होत आहे.


लुटमार, चोर्याचे वाढते प्रकार, नागरिकात चिंता
गेल्या काही दिवसात शहरासह जिल्ह्यात लुटमार, चोर्या याचे प्रकार वाढले आहेत. भर दिवसा लुटण्याचे प्रकार होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. लुटमार करणार्या टोळ्यांवर कारवाई करा, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -