ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय रेल्वेने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले की, रेल्वेने ‘गार्ड’चे पदनाम बदलून ‘ट्रेन मॅनेजर’ केले आहे. भारतीय रेल्वेने
जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ट्रेन गार्ड’चे पद बदलून ‘ट्रेन मॅनेजर’ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
मात्र, पदनामातील सुधारणेमुळे त्यांचा वेतन स्तर, नियुक्तीची पद्धत, विद्यमान कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, ज्येष्ठता आणि पदोन्नतीचे मार्ग बदलणार | नाहीत. रेल्वे मंत्रालयाने सर्व भारतीय रेल्वे/PU च्या महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात हे सांगण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की सुधारित पदनाम त्यांची विद्यमान कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांशी अधिक सुसंगत आहे आणि आता ‘ट्रेन मॅनेजर’ असलेल्या गार्डच्या प्रेरणा स्तरात सुधारणा होईल. याआधी रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन भारतीय रेल्वे आपल्या सेवांमध्ये सातत्याने आवश्यक ते बदल करत आहे.
मथुरा जंक्शनपर्यंत धावणार ही ट्रेन उत्तर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने काही रेल्वे सेवांमध्ये बदल जाहीर केले आहेत, जेणेकरून प्रवाशांना चांगली आणि आरामदायी सेवा देता येईल. दिल्लीतील शकूरबस्ती ते हरियाणातील पलवलपर्यंत धावणारी अनारक्षित ट्रेन आता उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनपर्यंत चालवली जाईल, असे उत्तर रेल्वेने म्हटले आहे.
महाराष्ट्रात संपर्क क्रांती पुन्हा धावणार दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रात संपर्क क्रांती पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 26 जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत ही ट्रेन धावणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.
उत्तर रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे की ट्रेन क्रमांक 04446, शकूरबस्ती-पलवल अनारक्षित मेल/ एक्सप्रेस ट्रेन 31 जानेवारीपासून मथुरा जंक्शनपर्यंत चालवली जाईल.
उत्तर रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन दिल्लीतील शकूरबस्ती येथून संध्याकाळी 06.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 08.16 वाजता पलवलला पोहोचेल. ही ट्रेन पलवल येथून रात्री 08.18 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.35 वाजता मथुरा जंक्शनला पोहोचेल. पलवल ते मथुरा जंक्शन दरम्यान ही ट्रेन रुंदी, शोलका, बनचारी, होडल, कोसी कलान, छटा, अजई, वृंदावन रोड आणि भुतेश्वर स्थानकावर थांबेल. शकूरबस्ती ते पलवल या गाडीच्या थांबा आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ट्रेनमध्ये आता असणार नाही ‘गार्ड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -