Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रऑक्सिजनची मागणी वाढल्यास कठोर निर्बंध

ऑक्सिजनची मागणी वाढल्यास कठोर निर्बंध

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात बोलताना राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिल्याचे दिसून आले. जर राज्यात ७०० मेट्रिक टनापेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली, तर मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अजित पवार यांनी बोलून दाखवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच कोरोना संदर्भातील राज्यस्तरावरील निर्णय हे घेतात. मंत्री महोदयांनी त्याच्याबाबतची नियमावली जाहीर केलेली आहे. पण रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे.

परंतु, हे सगळे होत असताना, जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आणि ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी राज्यात झाली, तर मग मात्र त्या संदर्भात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या बैठकीस अनुपस्थितीवरून सध्या भाजपकडून सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक वेळेस बैठक घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित राहिले पाहिजे, अस नाही..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -