Wednesday, February 5, 2025
Homeइचलकरंजीनतद्रष्ट राज्य सरकारमुळे वस्त्रोद्योग अडचणीत : प्रकाश आवाडे

नतद्रष्ट राज्य सरकारमुळे वस्त्रोद्योग अडचणीत : प्रकाश आवाडे

ताजी बातमी ऑनलाइन टीम

वस्त्रोद्योगापैकी 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. मात्र राज्य सरकारच्या नतद्रष्ट धोरणामुळे वस्त्रोद्योग अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन फॉर्म न भरणार्‍या यंत्रमागधारकांची वीज दरातील सवलत बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योगाला न परवडणारा असल्याचे मत आ. प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले. (MLA Prakash Awade)

वीज दर सबसिडीची मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीस निमंत्रण नसले तरी उपस्थित राहणारच आणि शहराची भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सध्याच्या राज्य शासनाला उद्योग, व्यवसाय, धंद्याशी काहीही घेणं-देणं नसल्याचे सांगत हे सरकार निबार असल्याची टीकाही त्यांनी केली.

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर माहिती न भरणार्‍या 27 अश्वशक्तीवरील उद्योजकांची वीज सवलत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योजकांना जवळपास दुप्पट दराने वीज बिल आले आहे. या पार्श्वभूमीवर पॉवरलूम असोसिएशनमध्ये शहरातील यंत्रमागधारक संघटनांची बैठक झाली. त्यानंतर प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

शासनाकडून पूर्वी 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीज सवलत मिळत होती. त्यामध्ये 75 पैसे अतिरिक्त सवलत मिळावी ही मागणी सातत्याने करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीच्या अधिवेशनात उपस्थित करून लवकरच सवलत जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र आजपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही. एकीकडे सवलत मिळण्यासाठी संघर्ष सुरू असताना जवळपास दुप्पट दराने वीज आकरणी करून ती उद्योजकांच्या माथी मारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -