Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानअशा प्रकारे घरबसल्या बदला मतदार कार्डमधील पत्ता

अशा प्रकारे घरबसल्या बदला मतदार कार्डमधील पत्ता



एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही स्थलांतरित होत असाल, तर तुमच्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल की, मतदार ओळखपत्र कसे तयार होणार? कोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत. तुम्ही याबाबत चिंतित असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला काही सोपी पद्धत आम्ही सांगत आहोत, त्या फॉलो करून तुम्ही घरबसल्या तुमच्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलू शकता. पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे मतदानासाठी सज्ज व्हा. तुम्ही पहिल्यांदाच मतदार असाल, तर तुमचे मतदार ओळखपत्र त्वरीत बनवा.


▪️तुम्हाला सर्वप्रथम नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलवर लॉग इन अथवा नोंदणी करावी लागेल.
▪️यानंतर ‘Correction of entries in electoral roll’ हा पर्याय निवडावा लागेल.
▪️नवीन पेज उघडल्यावर तिथे तुम्हाला फॉर्म ८ दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
आता मतदार ओळखपत्रात दुरुस्तीचा पर्याय दिसेल.
▪️येथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा आणि तुमचा पत्ता देखील भरा.
▪️माहिती दिल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात पत्ता पुरावा म्हणून आधार, परवाना यांचा समावेश असणार आहे.
▪️आता जी माहिती तुम्हाला बदलायची आहे, ती निवडायची आहे. त्यात नाव असल्यास नावाचा पर्याय निवडा आणि आणखी काही असल्यास त्याचा पर्याय निवडा.
▪️आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता सबमिट करावा लागेल
▪️आता सबमिट पर्यायावर क्लिक करा. व्हेरीफिकेशन केल्यानंतर तुम्हाला मतदार ओळखपत्र पाठवले जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -