ताजी बातमी ऑनलाइन टीम
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच व्हिसा रद्द केल्याप्रकरणी केलेल्या अपीलविरोधातील खटला हरला आहे. यासह, तो वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमधूनही बाहेर पडला. फेडरल कोर्टानेही जोकोविचला ऑस्ट्रेलियात तीन वर्षांसाठी प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
कोरोनाविरुद्ध लस न घेतल्याने जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला. त्याला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात इमिग्रेशनच्या ताब्यात घेण्यात आले. व्हिसा रद्द करण्याच्या विरोधात त्याने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. फेडरल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी रविवारी होती, तर वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन सोमवारपासून सुरू होत आहे.
इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉके यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी सार्वजनिक हिताच्या कारणास्तव ३४ वर्षीय सर्बियनचा व्हिसा रद्द करण्यासाठी मंत्री म्हणून आपल्या विशेषाधिकारांचा वापर केला आहे
नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियात ३ वर्ष नो एन्ट्री !
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -