Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रबिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण

बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण

ताजी बातमी ऑनलाइन टीम

शहरात गावगुंडांचा हौदस दिवसेदिवस वाढ आहेत. शस्त्राचा धाक दाखवत कधी सर्वसामान्य नागरिक तर कधी छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून हफ्ता मागत मारहाण केल्याच्या घटना सतत घडत असतात अश्यातच हडपसर येथील काळेबोराटेनगरमध्ये बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल कर्मचाऱ्याला सळईने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुईनुद्दीन खान (वय 42, रा. बोराटेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. 12 जानेवारी 2022च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

काळेबोराटेनगरमधील यशराज ग्रीन कास्टल येथे फिर्यादी मुईनुद्दीन खान (वय 42, हडपसर) हे काम करतात. घटनेच्या दिवशी आरोपी बिर्याणी खाण्यास आला. बिर्याणीचे पैसे मागितले. त्यावर आरोपीने मला बिर्याणीचे पैसे मागतो असे म्हणत मुईनुद्दीन खान यांना शिवीगाळ करत, टिक्का भाजण्याच्या सळईने मारहाण कारण्यास यासुरुवात केली. इतकंच नव्हे तर दुकानातील टाईल्स फोडत दुकानाचे नुकसान नुकसान केले.

आरोपीने हॉटेल मालकाला मारहाण कारण्याबरोबच हातातील सळई हवेत फिरवत आजूबाजूच्या दुकानात दहशत निर्मण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आर. गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -