ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोरोनाच्या तिसर्या लाटेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत पंधरा दिवसांत आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले. शाळा, कॉलेज बंद असल्याने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण घरोघरी जाऊन करण्याचा शासनाचा विचार असल्याचे ते म्हणाले.
कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला. अनेक जिल्ह्यांत कोरोनाबाधितांचे प्रमाण नगण्य आहेे. त्या ठिकाणी मुलांना कोरोनाचा धोका दिसत नाही. त्यामुळे बंद असणार्या शाळा किमान पन्?नास टक्के क्षमतेने तरी सुरू कराव्यात, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर टोपे यांनी शाळांबाबत शासन फेरविचार करणार असल्याचे नमूद केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यामध्ये 90 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 62 टक्के लोकांना दोन डोस दिले आहेत. लसीकरणाच्या मोहिमेला वर्षभरात राज्यात समाधानकारक यश मिळाले, त्याबद्दल आरोग्य कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. आता आपण किशोरावस्थेतील मुलांच्या लसीकरणाकडेही पाहत आहोत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शाळा बंदचा फेरविचार; मुख्यमंत्री निर्णय घेणार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -