राज्यातील ठाकरे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी इच्छुक नसून, सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आता ‘शिवनेरी ते मुंबई’ असा ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा ‘लाँग मार्च’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर जाऊन धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे. .
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजेच प्रस्थापित मराठ्यांचे सरकार आहे. यामुळे सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार हलगर्जीपणा करत आहे. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगला, शरद पवार यांचा बंगला सिल्वर ओक
आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरावर लाँग मार्च काढण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती केरे यांनी दिली आहे.
ठाकरे, पवारांच्या घरावर ‘लाँग मार्च’ ( मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी )
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -