Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रजम्बो ऑक्सिजन प्लांट, दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार

जम्बो ऑक्सिजन प्लांट, दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार

माहुल येथे जम्बो ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यानंतर निर्माण झालेल्या या ऑक्सिजन प्लांटचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीत मुंबई महानगरपालिका सुसज्ज झाली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्याने माहुल परिसरात भारत पेट्रोलियम कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ( व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) करण्यात आले. आजमितीला मुंबईत कार्यान्वित होणारे हे दोन ऑक्सिजन प्लांट म्हणजे कोणत्याही संकटाविरोधात लढण्याच्या मुंबई स्पिरीट चं अनोखं उदाहरण आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सज्ज आहे, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत सक्रिय सहभाग द्यायला हवा, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -