लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे मात्र , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली आहे.
देवीची रितीरिवाजा प्रमाणे पूजा करण्यात आली आहे. भाविकांना मात्र प्रशासनाने मांढरगडावर येण्यास बंदी घातली आहे. यावेळी मांढरदेव ट्रस्टने देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे.