ताजी बातमी ऑनलाइन टीम
असं म्हणतात जगात एकाच चेहर्याचे ‘सात’ मिळते-जुळते चेहरे असतात. हे वास्तव वाटावे असे नाव म्हणजे अभिषेक बाळासाहेब बारहाते. तो हुबेहूब उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या सारखा दिसतो, त्याचे कपडे अन् हेअर स्टाईलही त्याच्या सारखीच. त्यामुळे सध्या महाराष्ट्राभर एका वाहिनीच्या कार्यक्रामनिमित्ताने तो चांगलाच चर्चेत आला आहे. (Kim Jong in Ahmednagar)
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा मनमानी कारभार त्याची दहशत सर्व जगाला माहिती आहे. त्याची सरळ अमेरिकेला दिलेली धमकी असो किंवा कोरोना काळात चीनला उडून देण्याची दिलेली धमकी या-त्या कारणाने तो नेहमीच चर्चेत असतो. त्याच्याच सारखा हुबेहूब दिसणारा सोनई (ता. नेवासा) येथील अभिषेक बाळासाहेब बारहाते सध्या महाराष्ट्राभर एका वाहिनीच्या कार्यक्रमानिमित्ताने तो चांगलाच चर्चेत आला
2018 मध्ये एका वाहिनीवरील कार्यक्रमातून त्याने काम सुरू केले. त्यावेळी डोनाल्ड ड्रम्प आणि किम जोंग यांच्यात वाद चांगलाच गाजला होता. यांच्यावरच किम जोंग याच पात्रात अभिषेक बारहातेकडून डॉ. नीलेश साबळे यांनी करून घेतले. दिसायला हुबेहूब आणि त्यात नगरी भाषेचा विनोदी पद्धतीने केलला वापर यामुळे महाराष्ट्राचा किम जोंग कमी वेळातच व्हायरल झाला. पुढे दुसर्या एका शोमधून किम जोंग महाराष्ट्राच्या भेटीला आला.
किम जोंग’ अहमदनगरमध्ये, महाराष्ट्रभर चर्चा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -