Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाIPL 2022 : लखनऊने केएल राहुलसह ‘या’ दोघांची केली निवड

IPL 2022 : लखनऊने केएल राहुलसह ‘या’ दोघांची केली निवड



आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात12 आणि 13 तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार आहेत. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची परवानगी मिळाली होती.

या दोन नवीन फ्रेंचायझींना (ipl 2022 new teams) देखील तीन खेळाडू निवडता येणार आहेत. दरम्यान, अहमदाबाद नंतर लखनऊ संघानेदेखील आपल्या तीन खेळाडूंची निवड केली आहे. लखनऊने केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई यांची निवड केली आहे.


केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉइनिस आणि रवी बिश्नोई हे पुढच्या हंगामात लखनऊ फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसतील. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या राहुलकडे लखनऊ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपिवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लखनऊने राहुलला 15 कोटी रुपये, तर स्टॉइनिस 11 कोटी रुपये आणि बिश्नोईला चार कोटी रुपये देत संघासाठी निवड केली आहे.

तर अहमबाद फ्रँचायझीनं हार्दिक पांड्या (15 कोटी), राशीद खान (15 कोटी) आणि शुभमन गिल (7 कोटी) यांना सात कोटी मोजत आपल्या संघासाठी निवड केली आहे.राहुलने 2013 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. त्याचा पहिला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर होता. राहुल 2014 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग बनला आणि 2016 मध्ये त्याचा बंगलोर सोबत करार झाला. 2018 च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 11 कोटी रुपयांना विकत घेतले.


लोकेश राहुल ( KL Rahul) हा लखनऊ फ्रँचायझीच्या पहिल्या पसंतीचा खेळाडू होता. या संघासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नाव चर्चेत होते. अखेन या नव्या संघाने त्याला करारबद्ध केले.



2018 पासून राहुलची आयपीएलमधील कामगिरी दमदार झालेली आहे. मागील दोन पर्वात तो पंजाब किंग्सकडून खेळला. त्याने 55 सामन्यांत 56.62 च्या सरासरीनं 2548 धावा केल्या आहेत. त्यात 25 अर्धशतकं व दोन शतकांचा समावेश आहे. त्यानं 2018 ते 2021 या तीन पर्वात अनुक्रमे 659, 593 आणि 626 धावा केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -