ताजी बातमी ऑनलाईन टीम
जानेवारी महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढली असून अवघ्या पंधरा दिवसात जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ९०७ इतकी झाली आहे. जिल्ह्यासाठी ही बाब चिंताजनकच आहे. मंगळवारी जिल्ह्यात ३८७ नवे कोरोना बाधित आढळून आले. तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३०४४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात ३ जानेवारी २०२२ रोजी केवळ १३७ सक्रीय कोरोना रुग्ण होते, त्यामध्ये झपाटयाने वाढ झाली, त्यामध्ये दिनांक ३ ते १८ जानेवारी या अवघ्या पंधरा दिवसात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या २९०७ वर पोहोचली. जिल्ह्यातील एकूण २ एकू लाख ११ हजार २ पॉझिटिव्ह झा रूग्णापैकी २ लाख २ हजार १४८ दा रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
इचलकरंजी त मंगळवारी २९ नवे रुग्ण
प्रशासनाकडून सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सांगली रोड, डेक्कन रोड, इंडस्ट्रियल इस्टेट, सुतार मळा, हत्ती चौक भागात प्रत्येकी दोन रूग्ण तर इंदिरा हौसिंग सोसायटी, स्वामी समर्थ मंदिर परिसर, आरगे मळा, तांबे मळा, इंदिरानगर, महालक्ष्मीनगर, नाईक मळा, योगाश्रम परिसर, लक्ष्मी व्यंकटेशनगर, शेळके भवन, लाखेनगर, यशवंत कॉलनी, सोन्या मारूती मंदिर परिसर, दत्तनगर, आण्णा रामगोंडा शाळा परिसर, सोलगे मळा, संत मळा, कोरवी गल्ली, वखारभाग आदी भागात क प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला. सध्या ११३ अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण ५ हजार ८१० जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३०४४ इतकी आहे. ये
चिंताजनक ; कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 907 सक्रिय कोरोना रुग्ण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -