ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज्यातील 31 जिल्ह्यांत 106 नगरपंचायती (Nagar Panchayat Elections 2022), 2 जि.प. (Zilha Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर मंगळवारी मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत राज्यभरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच काही जिल्ह्यात धक्कादायक निकाल समोर आले आहेत..
नगरपंचायत निवडणुकीत भाजपजी बाजी, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मिळवल्या किती जागा
106 नगरपंचायती, दोन जिल्हा परिषदांच्या 413 जागांसाठी झाली मतमोजणी
106 पैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती, 9 नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार
106 नगरपंचायतींच्या तब्बल 1802 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सरस
नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक 389 जागा जिंकून भाजपनं पटकावला अव्वल क्रमांक
382 जागा मिळवून राष्ट्रवादी दुसऱ्या, तर 284 जागांसह शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर
नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस शेवटच्या स्थानी, 274 जागां विजय मिळण्यात काँग्रेसला यश
अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीची शिजली नाही डाळ, आमदार रवी राणा यांची जादू कायम
-काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात भाजपला खातेही उघडता आले नाही
-राष्ट्रवादी काँग्रेसची हीच स्थिती, तिवसा येथे 12 जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित
– भातकुली येथे 9 जागा जिंकून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित
– काँग्रेस आणि रवी राणा यांचीच सत्ता असणार
– तिवसामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यांनी चांगले काम करत काँग्रेसला अधिक बळ
राजकारणाच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पाटील यांची दणक्यात एन्ट्री
सांगलीत कवठेमहंकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड
रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 17 पैकी 10 जागा जिंकत एकहाती मिळवली सत्ता
रोहित पाटील यांच्या या दमदार विजयानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
हा सर्वसामान्य जनतेचा विजय, विजयानंतर रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
विजयानंतर भावूक होत रोहित पाटील म्हणाले आज आबांची खूप आठवण येते आहे
2022 Result : नगरपंचायत निवडणुकीत भाजपजी बाजी, जाणून घ्या कोणत्या पक्षाने मिळवल्या किती जागा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -