Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय ( बुधवारी 607 बांधीत तर दोघांचा मृत्यू...

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय ( बुधवारी 607 बांधीत तर दोघांचा मृत्यू )

ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी ६०७ नवे कोरोना बाधित आढळून आले तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्ह्याचा धोका वाढविणारीच आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात २४५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये आढळून आलेल्या ६०२ नव्या बाधितांमध्ये कोल्हापूर महानगरपालीकेमध्ये ३१६ रुग्ण आढळून आले आहेत, याबरोबरच आजरा-३, भुदरगड१, चंदगड-५, गडहिंग्जल-१२, हातकणंगले-३४, कागल-४, करवीर-९५, पन्हाळा-१०, राधानगरी-११,शाहुवाडी-६, आणि शिरोळ तालुका-२० तर जयसिंगपूर नगरपरिषद-१७, कुरुंदवाड नगरपरिषद-३,कागल नगरपरिषद-३, पेठवडगांव नगरपरिषद-२, हुपरी नगरपरिषद३, आणि अन्य जिल्ह्यातील २३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ११ हजार ६०९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख २ हजार ३७० रूग्णाना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८१२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३४२७ इतकी आहे.


इचलकरंजीत
गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनावर पुन्हा ताण पडू लागला आहे. तर वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. रूग्ण संख्या वाढत असली तरी शासनाने दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे दिसून येते.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्या २८ रूग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये जवाहरनगर ३, शहापूर, आयजीएम परिसर भागात प्रत्येकी २, संतमळा, इंदिरा हौसिंग सोसायटी, वर्धमान चौक, दातेमळा, कोल्हापूर नाका, सांगली रोड, वेदभवन परिसर, गुजरीपेठ, शाहुकॉर्नर, भारतमाता हौसिंग सोसायटी, कृष्णानगर, हिरकणी हॉटेल परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, बावणे गल्ली, रेणुकानगर, दत्तनगर, जगताप तालिम, हत्तीचौक, नारायण टॉकीज परिसर, शांतीनगर, आदी परिसरात १ रूग्ण आढळून आला. सध्या १२७ अॅक्टीव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -