Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रकिरकोळ कारणावरून एकास मारहाण

किरकोळ कारणावरून एकास मारहाण

ताजी बातमी ऑनलाइन टीम

भिलवडी येथील साखरवाडीत बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास खिडकी बसवण्याच्या कारणावरून एकास मारहाण करण्यात आली. याबाबत तौफीक कादर फकीर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याची माहिती भिलवडी पोलीसांनी दिली. सेट्रींग काम करणारे तौफीक कादर फकीर (वय ३५) यास तुझ्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर खिडकी का काढली ती जागा आमची आहे, असे म्हणून मारूती सिद्ध हराळे याने तौफीकचा हात पिरगाळून त्यास शिवीगाळ केली. तसेच मोहन सय्याप्पा हराळे याने पाठीमागून धरले व आप्पा हराळे याने कॉलर धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्लास्टिकच्या किटलीने डोक्यात, कपाळावर डाव्या बाजूस जोरात मारहाण करून तौफीकला जखमी केले आहे, असे फियादित म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -