भारतीय औषधांच्या व्यापारपेठेत नुकत्याच संपलेल्या 2021 सालामध्ये विषाणूविरोधी औषधांच्या विक्रीने सर्वाधिक वाढ नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिवर्षी सतत अग्रस्थानी असलेल्या मधुमेह व हृदयरोगांवरील औषधांची वाढ यंदा खालच्या स्थानावर आहे.
औषधांच्या खपवाढीच्या स्पर्धेमध्ये 25.5 टक्क्यांची वाढ नोंदविणारी विषाणूविरोधी औषधे पहिल्या स्थानावर आहेत. वेदनाशामक औषधांचा खप (22.6 टक्के) यंदा दुसर्या स्थानावर आहे. श्वनससंस्थेशी निगडित आजारावरील औषधांचा खप (20.1 टक्के) तिसर्या स्थानावर असून, व्हिटॅमिन्स, मिनरल आणि न्यूट्रिएंटस् 15.8 टक्के खपवाढीच्या आधारावर चौथ्या स्थानावर आहेत, तर हृदयरोग व मधुमेहावरील औषधांच्या खपाने गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 9 टक्के व 6.1 टक्के इतकी वाढ नोंदविली आहे.